संजय राऊतांनी थेट फडणवीसांना दिले आव्हान; पवारांची मुलाखत घ्यावी आणि छापण्याची हिम्मत दाखवावी !

sanjay raut and devendra fadnvis

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची संजय राऊत यांनी मुलाखत घेतली होती. हि मुलाखत तीन भागांमध्ये प्रदर्शित होत असून त्यात पवारांनी अनेक खुलासे केले आहेत. त्यावर भाजपा नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर फडणवीसांनी हि मुलाखत म्हणजे ‘मॅच फिक्सिंग’ असल्याचे म्हटले असून हि संपूर्ण मुलाखत संपल्यावर प्रतिक्रिया देईन असे देखील सांगितले होते.

यावर आता संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनाच थेट आव्हान दिले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची मुलाखत घ्यावी, पाहुयात ते मुलाखत देतात का, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. तुमचीही वृत्तपत्रं आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची मुलाख घ्यावी आणि मुलाखत छापण्याची हिंमत दाखवावी असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. टीव्ही ९ मराठीने संजय राऊत यांच्याशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी मनसेने केली ‘हि’ मागणी

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच फडणवीस यांनी सामना हे आधी शिवसेनेचं मुखपत्र होतं आता ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचंही मुखपत्र झाल्याचं म्हटलं आहे. या टीकेवर संजय राऊत यांनी उत्तर दिलंय, सामना हे लोकांचं वृत्तपत्र आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

पवार-राऊत मुलाखतीवर टीका करतान फडणवीस यांनी ही मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग किंवा नुरा कुस्तीसारखी आहे अशी टीका केली. मॅच फिक्सिंग एकदा संपूद्या मी त्यावर नक्की प्रतिक्रिया देईन असंही ते म्हणाले होते. एवढंच नाही तर करोनाच्या काळात राजकारण केलं जातं आहे. सरकार पाडायचा प्रयत्न होतो आहे असंही संजय राऊत म्हणाले होते. त्यावरही फडणवीस यांनी टीका केली. स्वतःच मारुन घ्यायचं आणि स्वतःच रडायचं ही नवी पद्धत आहे. कोणीही सरकार पाडत नसून हे कांगावा करत असल्याचं म्हटलं होत.

जम्मू-काश्मीर : अनंतनागमध्ये दहशतवाद्याचा खात्मा