मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून विविध मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच तुम्ही खाताय ते शेण व आम्ही खातोय ते श्रीखंड, असा भाजप नेत्यांचा कावा असल्याचेही राऊत म्हणाले आहेत.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘भाजपच्या किमान आठ माजी मंत्री व डझनभर आमदारांनी आधीच्या सरकारमध्ये जे घोटाळे करून ठेवलेत ते धक्कादायक आहेत. त्या फाईल्स आता उघडल्या आहेत. खरे तर यापैकी अनेक फाईल्स ‘ईडी’ने उघडून तपास कराव्यात अशा आहेत. आयकर विभागाने खोलात शिराव्यात अशी ही प्रकरणे आहेत, पण ‘उल्टा चोर कोतवाल को डांटे’ असा प्रकार सुरू आहे. ‘ईडी’ वगैरेची व्यवस्था फक्त भाजप विरोधकांसाठीच आहे, हे आता लोकांच्या लक्षात आले आहे.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘भ्रष्टाचाराच्या किंवा घोटाळ्यांच्या बाबतीत ‘तुम्ही खाताय ते शेण व आम्ही खातोय ते श्रीखंड’ असा कावा विरोधी पक्षाचा आहे. पुन्हा कुणी त्यांना आरसा दाखवला तर महाराष्ट्र पेटवायची भाषा हे लोक करतात. विरोधी पक्षनेते दरेकर यांना कॅबिनेट दर्जा आहे व ते भाजपात बाहेरून आले तरी अनेक जुन्याजाणत्यांना डावलून फडणवीस यांनी दरेकरांना लगेच विरोधी पक्षनेतेपदी बसवले. या मेहेरबानीची पाळेमुळे मुंबै बँक गैरव्यवहारात गुंतली आहेत काय? याचाही स्वतंत्र तपास व्हायला हवा’, असेही राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- “…हे मन स्थिर असल्याचे लक्षण नाही”, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
- …अशी विधाने भाजप पुढाऱ्यांच्या तोंडी शोभत नाहीत- संजय राऊत
- धोनीसोबत वादांच्या चर्चेवर गंभीरने पहिल्यांदाच केला खुलासा; म्हणाला…
- पोलीस व्यवस्थेस धमक्या द्यायच्या, ही कुठली रीत?- संजय राऊत
- अलियाच्या गंगूबाई काठियावाडीची क्रेझ आयफेल टॉवरपर्यंत; साडी नेसून महिलांनी केला भन्नाट डान्स!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<