मराठी माणसाने मुंबईसाठी रक्त सांडलं ते गटाराचे पाणी होतं काय?-संजय राऊत

परप्रांतीयांमुळे मुंबईचा विकास झाला या मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा घेतला संजय राऊत यांनी समाचार

टीम महाराष्ट्र देशा- मराठी माणसाने मुंबईसाठी रक्त सांडलं ते गटाराचे पाणी होते असं भाजपला वाटतं काय?असा सवाल उपस्थित करत परप्रांतीयांमुळे मुंबईचा विकास झाला आहे असं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी बोलणे हा मुंबईसाठी बलीदान केलेल्या 105 हुतात्म्यांच्या अपमान असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

नाना शंकर शेठ, भाऊ दाजी लाड आणि अनेक पारशी दानशुर लोकांनी मुंबईच्या विकासासाठी योगदान दिलं आहे. गिरणी कामगार तडीपार झाला. गिरण्या बंद पडल्या व त्या जमीनीवर ज्यांनी टॉवर ऊभारून मराठी माणसांचे नुकसान केलं त्यांची बदलावी सरकार करीत असेल तर ते महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावं लागेल. मुंबई महाराष्ट्रात राहील काय अशी भिती वाटायला लागली आहे. तसंच हुतात्मा स्मारकावर फुलं चढवून काही होतं नसतं असंही ते म्हणाले.