fbpx

टीडीपीनंतर आता इतर पक्षही एनडीएतून बाहेर पडतील- राऊत 

sanjay-raut

टीम महाराष्ट्र देशा- एनडीएतून बाहेर पडण्याची तेलुगू देशम पक्षाची कृती अपेक्षित होती. आता इतर पक्षही एनडीएतून बाहेर पडतील. भाजपाचे एनडीएतील कोणत्याही घटक पक्षाशी चांगले संबंध राहिले नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे . टीडीपीने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर सेनेने दिलेली ही पहिली प्रतिक्रिया होती.

काल तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी याबाबत घोषणा केली.अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांना आज मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे आदेश चंद्राबाबूंनी दिले आहेत.“राजकारणातील एक जुना-जाणता नेता म्हणून आणि एक जबाबदार राजकारणी म्हणून पंतप्रधानांपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला, जेणेकरुन त्यांना आमचा हा निर्णय सांगता आला असता. मात्र आमच्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता”, असेही चंद्राबाबूंनी सांगितले होते.

बुधवारी रात्री टीडीपीने केंद्र सरकारकडून आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळत नाही व पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटही देत नसल्याचे सांगत आपले दोन केंद्रीय मंत्री राजीनामा देतील असे जाहीर केले होते. त्यावर शिवसेनने आपली प्रतिक्रिया दिली. आंध्र प्रदेशला विशेष पॅकेज देण्यास आम्ही तयार आहोत, मात्र विशेष राज्याचा दर्जा देता येणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल स्पष्ट केले होते. त्यानंतर तडजोडीला नकार देत एनडीएतून बाहेर पडण्याचा टोकाचा निर्णय टीडीपीनं घेतला.

विभाजनानंतर आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यावरुन केंद्र सरकार आणि आंध्र प्रदेशच्या सरकारमध्ये तणावाचे वातावरण होते. दरम्यान, आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देता येणार नाही. मात्र, राज्यासाठी विशेष पॅकेज देण्यास आम्ही कटीबद्ध आहोत असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी पत्रकार स्पष्ट केले. मात्र, यावर समाधान न झाल्याने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रातील आपले मंत्री अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत.

 

1 Comment

Click here to post a comment