मुंबई : राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केलेला भोंग्याचा मुद्दा संपण्याचे नाव घेत नाही आहे. राज ठाकरे यांनी जरी हा मुद्दा सामाजिक असल्याचे सांगितले असले तरी याचे राजकीय पडसाद राज्यात उमटत आहेत. दरम्यान, मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा मनसे आणि केंद्र सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, महागाईवर बोला, असा टोला संजय राऊत यांनी मोदी सरकारला लगावला आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची चिंता आहे. त्यासाठी ते मध्यस्थी करत आहेत. त्यासाठी त्यांचे भक्त त्यांची वाहवाह करत आहेत. मात्र, या देशातील जनता महागाईशी युद्ध करत आहे.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘पेट्रोल, डिझेल, सिलेंडर दर, बेरोजगारी या संदर्भात भाजपचा एकही नेता, मंत्री बोलत नाही. भोंग्यावर कसले बोलताय, महागाई, बेरोजगारीवर बोला. सरकार म्हणून अन्न, वस्त्र, निवारा, महागाई यावर बोलणं सरकारचे कर्तव्य आहे. भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही’, असे राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- पराभवानंतर पुन्हा रामदास आठवले यांची शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा !
- “भोंग्यावरील भूमिकेचा सर्वात मोठा फटका…”, संजय राऊत यांचे वक्तव्य
- राज ठाकरेंच्या भूमिकेवर सर्वात जास्त हिंदू समाज नाराज – संजय राऊत
- शिवसेनेचे हिटमॅन..! रोहित शर्मासारखा संजय राऊतांनी खेळला Pull Shot; पाहा VIDEO
- “हिंदू समाजातच फूट पाडून…”, भोंग्याच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांची मनसेवर टीका