Share

Sanjay Raut | बेईमान व्यक्तीशी शिवरायांची तुलना करुन महाराष्ट्राचा अपमान – संजय राऊत

Sanjay Raut on Mangal Prabhat Lodha | मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे राज्य सरकारची मोठी अडचण होत आहे. विरोधक आक्रमक झाले आहेत. आधीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण तापले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप मंत्र्यांवर टीका केली आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांमध्ये भाजपच्या नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे, असे वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

भाजप नेत्यांवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घणाघात केला आहे. बेईमान व्यक्तीशी शिवरायांची तुलना करुन महाराष्ट्राचा अपमान केल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. “भाजपच्या सुधांशू त्रिवेदी याने छत्रपतींना माफिवीर ठरवले. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज नायक नाहीत, जुने झाले सांगितले. आता बेईमान व्यक्तीशी शिवरायांची तुलना करुन महाराष्ट्राचा अपमान केला आहे. राज्यातील सरकार खोके सरकार म्हणून अख्या देशात कुख्याच झाले आहे. या सरकारमध्ये स्पर्धा लागली आहे का? की कोण सर्वात जास्त छत्रपतींचा अपमान करेल. त्याला काही दिल्लीने कोण बनेगा करोडपतीसारखे मोठे बक्षीस लावले आहे का? कोण करेगा छत्रपतीका अपमान, असंच दिसत आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासासंदर्भात चुकीचे विधान करून त्यांची तुलना एका पक्षाशी, राज्याशी बेईमानी करणाऱ्या व्यक्तिबरोबर करतात. शिवाजी महाराज काय बेईमान होते का?. दिल्लीत जाऊन महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ठाण मांडून बसा. ते तुमच्या हातात आहे. गृहमंत्री अमित शहांना मुख्यमंत्र्यांनी पत्र तरी पाठवावे. कॅबिनेटने निषेध करणारा ठराव तरी मंजूर करावा. मात्र हे लोक राज्याला मुर्ख बनवत आहेत. हे छत्रपतींचा मूग गिळून पाहत आहेत. डोळे मिटून पाहत आहेत.”

काय म्हणाले होते मंगलप्रभात लोढा – 

मंगलप्रभात लोढा म्हणाले होते की औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केले होते पण ते स्वराज्यासाठी बाहेर पडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही कोणीतरी कैद केले होते पण ते महाराष्ट्रासाठी बाहेर पडले. लोढा यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.

काल शिवप्रताप दिवस होता. यानिमित्त प्रतापगडमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. यावेळी बोलताना मंगलप्रभात लोढा यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून पलायनाशी केली.

महत्वाच्या बातम्या :

Sanjay Raut on Mangal Prabhat Lodha | मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now