मुंबई : सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेच्या नावाखाली भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांनी गोळा केलेल्या वर्गणीचे पैसे लाटल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केल्यानंतर किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना चौकशीला हजर राहण्यासाठी मुंबई पोलिसांकडून नोटिसीद्वारे आदेश देण्यात आले होते. परंतु किरीट सोमय्या हे त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दिल्लीला गेले असल्याची माहिती त्यांच्या वकीलांनी दिली. दरम्यान, या मुद्द्यावरून आता संजय राऊत यांनी सोमय्या पिता-पुत्रांवर निशाणा साधला आहे. तसेच यांना शोधण्यासाठी लूकआऊट नोटीस जारी करण्यात यावी असेही राऊत म्हणाले आहेत.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘किरीट सोमय्या मुलासह फरार झाले आहेत. न्याय यंत्रणेवर दबाव आणुन सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात हे ठग आहेत. न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्र तयार केली तरी सत्याचाच विजय होईल. प्रश्न इतकाच की. हे दोन ठग कोठे आहेत? मेहुल चोकसी प्रमाणे पळून तर गेले नाहित?’, असा सवाल राऊत यांनी केला आहे. तसेच आयएनएस विक्रांतच्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून राज्यातच नाही तर राज्याबाहेरही पैसे गोळा करण्यात आले आहे. तसेच चुकीचे काम केलं तर राजभवनांची उरली सुरली इज्जतही जाईल, असेही राऊत यावेळी म्हणाले.
दरम्यान, काल देखील या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी सोमय्या पिता-पुत्रांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला होता.‘सोमय्या बाप बेटे फरार है. ये दोनो मिल्खा सिंग से तेज भाग रहे हैं. Ok. भाग सोमय्या भाग’, असे राऊत म्हणाले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
- “मातोश्रीतल्या ठाकरेंनी लाखालाखांच्या जाहीर सभा घेऊन दाखवाव्यात कोण संपलंय…”, ‘मनसे’चे खुले आव्हान
- “जो धर्मा-धर्मात, जाती-जातींमध्ये वाद निर्माण करतोय अशा…”, शरद पवारांचा इशारा
- “सदावर्तेचा भस्मासुर निर्माण करण्यात भाजपचे मोठे योगदान”, राऊतांचा गंभीर आरोप
- “गेली सांगून मवि आघाडी की जनते परीस कुत्रीमांजरी…” , भातखळकरांचा टोला
- अनिल परब यांच्या ‘त्या’ निर्णयावर भातखळकरांची टीका; म्हणाले, “तुरुंगात असणारे नवाब मलिक…”