मुंबई: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. त्यात महाविकास आघाडी सरकारने बाजी मारली. कोल्हापूर उत्तर विधानसभा काँगेसच्या जयश्री जाधव यांनी जिंकली आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली. तेथे त्यांच्या पत्नीच महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. ९७ हजार ३३२ मते मिळवून त्या विजयी झाल्या. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधत टीका केली आहे.
कोल्हापूर उत्तरेत विजयासाठी भाजपाने प्रयत्न केले नाहीत. त्यांनी मोठी यंत्रणा कामास लावली, मोठ्या प्रमाणात पैसाअडका खर्च केला. मतदारांना पैशांचे वाटप करताना भाजपाचे लोक रंगेहाथ पकडले गेले. कोल्हापुरातील हिंदुत्ववादी मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात तळ ठोकून बसले. याचदरम्यान ‘मशिदींवरील भोंगे विरुद्ध हनुमान चालिसा’सारखे विषय तापविण्यात आले. या सगळ्यांचा परिणाम कोल्हापूरच्या मतदारांवर झाला नाही व तेथे काँग्रेसच्या जयश्री जाधव या महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून जिंकून आल्या. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
कोल्हापूरची ही जागा परंपरेने शिवसेनेची. म्हणजे हिंदुत्ववादी विचारांची पाठराखण करणारा हा मतदारसंघ. एखाददुसरा अपवाद वगळता येथे शिवसेनेचेच शिलेदार विजयी झाले. २०१९ साली अटीतटीच्या लढतीत ही जागा शिवसेनेकडून काँग्रेसकडे गेली. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने ही जागा पुन्हा शिवसेनेला मिळावी अशी मागणी होती. तरीही जयश्री जाधवांच्या प्रचार कामात शिवसैनिकांनी झोकून दिले. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत तीन पक्षांनी एकत्रितपणे काम केले व भाजपाचा डाव उधळून लावला. निवडणूक जिंकण्यासाठी जातीय हिंसा घडवू पाहणाऱ्यांना ही चपराक आहे. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- “चंद्रकांत पाटील निवडणुकीस उभे राहिले असते तर…”, संजय राऊतांचा खोचक टोला
- “चंद्रकांत पाटलांनी हिमालयात न जाता महाराष्ट्रातच राहावे कारण…”, संजय राऊतांचा टोला
- IPL 2022 CSK vs GT : मिलरच्या ‘किलर’ खेळीमुळं गुजरातचा विजय..! चुरशीच्या लढतीत चेन्नईला दिली मात
- भारताच्या चेतेश्वर पुजाराचा इंग्लंडमध्ये ‘डबल’ धमाका; द्विशतकही ठोकलं आणि…! पाहा VIDEO
- IPL 2022: ‘प्लेयर ऑफ द मॅच’ उमरान मलिकचे मोठे वक्तव्य; म्हणाला “माझे काम वेगाने फलंदाजांना…”