Share

Sanjay Raut | वीर सावरकर हे भाजप आणि संघाचे श्रद्धास्थान कधीच नव्हते – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई :  काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी वीर सावरकरांबाबत (Veer Savarkar) केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण पेटले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली आहे.  या प्रकरणी संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर टीका केली.

“आपल्या देशामध्ये तक्रारी दाखल करणं, आणि तक्रारीच्या आधारावर प्रसिध्दी मिळवणं हा राजकीय उद्योग झाला आहे. वीर सावरकरांचा  (Veer Savarkar) मुद्दा हा महत्त्वाचा आहे. वीर सावरकरांची बदनामी शिवसेनेला मान्य नाही, असे उध्दव ठाकरे यांनी काल सांगितले आहे. ही यात्रा सुरु असताना वीर सावरकरांचा विषय काढण्याची गरज नव्हती. हा विषय काढल्यामुळे फक्त शिवसेनेलाच नाही तर महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांना देखील धक्का बसला आहे”, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे.

राजकारणासाठी वीर सावरकरांचा विषय घेतला-

“राहुल गांधी  (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला. या देशातील हुकूमशाहीकडे नेणारे वातावरण, देशाला पुन्हा पुन्हा गुलामगिरीच्या बेड्या ठोकणार, महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचाराविरोधात भारत जोडो यात्रा आहे. मात्र वीर सावरकरांचा विषय काढण्याचे काही कारण नव्हते. यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना धक्का बसला. वीर सावरकरांना भारतरत्न द्यावा, अशी आमची मागणी आहे. ही मागणी का उचलून धरत नाहीत. वीर सावरकर हे भाजप आणि संघाचे श्रद्धास्थान कधीच नव्हते, असा इतिहास आहे. पण आता राजकारणासाठी त्यांनी वीर सावरकरांचा विषय घेतला आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्ष बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) च्या वतीने वंदना सुहास डोंगरे यांनी वीर सावरकरांवर केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत ‘स्वातंत्र्यसैनिकाची बदनामी आणि स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या’प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी भादंवि कलम ५०० आणि ५०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी-

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणाले की, वीर सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिले की, “मै आपका नौकर रहना चाहता हु” आणि त्यावर स्वाक्षरी केली. सावरकरांनी इंग्रजांना मदत केली. त्यांनी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांच्यासारख्या नेत्यांचा पत्रावर सही करून विश्वासघात केला.

महत्वाच्या बातम्या :

Sanjay Raut | मुंबई :  काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी वीर सावरकरांबाबत (Veer Savarkar) केलेल्या वक्तव्यामुळे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now