मुंबई: आज गुरुपौर्णिमा आहे. आजच्या दिवशी आपल्या वैयक्तिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील गुरूंना वंदन केले जाते. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजळा दिला. तसेच गेल्या काही दिवसात शिवसेनेशी बंड केलेल्या आमदार, खासदार आणि इतर पदाधिकाऱ्यांना उद्देशून टीका देखील केली.
बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सगळ्यांचे गुरु होते. ज्यांची शिवसेनेवर निष्ठा आहे, महाराष्ट्रावर आणि देशावर निष्ठा आहे. त्या सगळ्यांचे बाळासाहेब हे गुरु होते. मात्र आता काही लोक शिवसेनेच्या बाहेर जाऊन बाळासाहेब आमचे गुरु आहेत, असे म्हणत आहेत. जर आज बाळासाहेब असते तर पक्षाशी एकनिष्ठ न राहिलेल्या या लोकांवर त्यांनी काय भाष्य केले असते, हे समजून घेणे गरजेचे आहे. एकनिष्ठ राहणे हीच खरी गुरुदक्षिणा आहे, असे देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<