मुंबई: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड करत वेगळा गट स्थापन केला आहे. त्यांच्यासोबत इतर सेना आमदारांनीही बंड पुकारला आहे. जवळपास ४० हून अधिक आमदार शिंदे गटात असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. हे सर्व बंडखोर आमदार सध्या गुवाहाटी येथे मुक्कामाला आहेत. यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून टीका केली आहे.
मुंबईतील बंडखोरांच्या मुखपत्रात एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. श्रीमान अमित शहांनी म्हणे बंडखोर आमदारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मधुर संवाद साधला आहे. या संवादात म्हणे श्री. शहा यांनी बंडखोरांच्या अपात्रतेविषयी चर्चा केली. बंडखोर आमदारांवर कारवाई होऊ देणार नाही, असे आश्वासन शहा यांनी दिले असे प्रसिद्ध झाले. अमित शहा यांच्याशी संवाद पार पडल्यावर बंडखोर आमदारांत उत्साह संचारला. या उत्साहात भर पडावी म्हणून गृहमंत्री शहा यांनी बंडखोर आमदारांना केंद्रीय सुरक्षा पुरवली, असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.
“गुवाहाटीमधील आमदार मंडळी शहा यांच्याशी झालेल्या संवादानंतर इतकी खूश झाली की, त्यांनी आपला आसाममधील मुक्काम आणखी सात दिवस वाढविला आहे. बंडखोर आमदारांना जे करायचे त्यासाठी ते मुखत्यार आहेत. त्यात सात-आठ मंत्री आहेत, आमदार आहेत. आपली मंत्रालये, विभाग सोडून ते महाराष्ट्राबाहेर जाऊन बसले आहेत. कृषी, उच्च शिक्षण, पाणीपुरवठा, फलोत्पादन वगैरे खाती जनतेच्या जिव्हाळ्याची आहेत, पण हे मंत्री त्यांचे विभाग वाऱ्यावर सोडून गुवाहाटीच्या ‘रॅडिसन ब्लू’ हॉटेलात बसले आहेत. जनामनाची लाज असती तर मंत्रीपदाचे राजीनामे देऊन ते राज्याबाहेर गेले असते, पण शिवसेनेने दिलेली मंत्रीपदे कायम ठेवून ते तत्त्वाची भाषा करीत आहेत,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sandeep Deshpande : “लोकप्रभा मध्ये कारकून असणाऱ्यांना राजसाहेबांनी…”, ‘मनसे’चा संजय राऊतांना टोला
- Eknath Shinde : “आम्ही पराभूत केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना अजित पवार…”; एकनाथ शिंदेंकडून देसाईंचा व्हिडीओ ट्वीट
- Sanjay Raut : “जहालत एक किस्म कि मौत…”, संजय राऊतांचे ट्वीट चर्चेत
- Aditya Thackeray : मुंबईत इमारत कोसळून मोठी दुर्घटना, आदित्य ठाकरेंनी घेतली घटनास्थळी धाव
- Sumit Khambekar : अजित पवार कोरोना पाॅझिटिव्ह; ‘मनसे’ने म्हटले, “मुख्यमंत्री साहेबांचा सल्ला घ्या कारण..”
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<