Share

Sanjay Raut | “लवकरात लवकर राज्यातील सरकार घालवलं नाही तर…”; संजय राऊतांचं मोठं भाकीत

Sanjay Raut । मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला आता सात दशकांहून जास्त काळ उलटला. मात्र, कर्नाटकसोबत असलेला सीमाप्रश्न अजूनही सुटलेला नाही. सीमाभागातील अनेक गावांना महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा असल्याचा दावा सातत्याने महाराष्ट्राकडून केला जात आहे. बेळगावमध्ये यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) अत्यंत कमजोर आणि हतबल सरकार असल्यामुळं महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra Karnataka Border Disputes) निर्माण होत असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. कोणाला मुंबई तोडायचीय, कोणाला महाराष्ट्राचे जिल्हे आणि गावं तोडायचीत. गेल्या साडेतीन महिन्यापासून महाराष्ट्र कुरतडण्याचं काम सुरु असल्याचेही राऊत म्हणाले.

“हे सगळं सुरु असताना मुख्यमंत्री 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला निघाले आहेत. तुकडून आल्यावरआसामच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील एखाद्या जिल्ह्यावर दावा करु नये म्हणजे झालं”, असा टोलाही राऊतांनी शिंदे सरकारला लगावला. हे सरकार राज्यात आल्यामुळं अनेक राजकीय दरोडेखोरांना असं वाटत आहे की आपण महाराष्ट्राचे लचके तोडू असेही राऊत यांनी म्हंटल.

“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा सांगितला आहे. त्यामुळं हे सरकार जर लवकरात लवकर घालवलं नाहीतर राज्याचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे हस्तक राहणार नाहीत”, अशी टीका संजय राऊत यांनी राज्य सरकारवर केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Sanjay Raut । मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now