Share

Sanjay Raut | “…तर सरकारला अमित शाहादेखील वाचवू शकणार नाहीत”; संजय राऊत असं का म्हणाले?

Sanjay Raut | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे एकीकडे ठाकरे विरुद्ध शिंदे गटात आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरु आहे तर दुसरीकडे सत्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा संघर्ष पाहायला मिळतोय. त्यातच भर म्हणजे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून अस्थिरता निर्माण झाली आहे. अशातच उद्धव ठाकरे गटातील खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना दैनिकातील ‘रोखठोक’ या सदरात मोठे विधान केले आहे.

संजय राऊत म्हणाले, “मंत्रालयात सध्या पैशांची उलाढाल सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना आपल्या ४० आमदारांना जपण्याचेच काम आहेत. या सर्व उलाढाली एक दिवस अंगलट येणार असून सरकारला अमित शाहादेखील वाचवू शकणार नाहीत.” संजय राऊतांनी ‘रोकठोक’च्या माध्यमातून राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य करत सरकारला लक्ष्य केलं आहे.

‘राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवरायांचा सरळ अपमान केला. तरीही ते राज्यपालपदावर चिकटून आहेत. राज्यपालांचे काय करायचे? याबाबत सरकारने देवीला विचारणा केली काय?, असा बोचरा सवाल संजय राऊतांनी केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांवर दावाच सांगितला. बेळगाव-कारवार-निपाणीसह मराठी सीमा भाग राहिला बाजूला, उलट आणखी दोन जिल्हेही आमचेच, असे बरळणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध जनता संतापली, पण राज्यकर्ते थंड असल्याचं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलीय.

“महाराष्ट्रातून मोठे उद्योग बाजूच्या गुजरात राज्यात पळवून नेले जात आहेत. लाखोंचा रोजगार त्यामुळे बुडाला व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) हे त्यावर थातूरमातूर उत्तरे देऊन निघून जात आहेत. गुजरात किंवा कर्नाटकने महाराष्ट्राच्या बाबतीत जो अन्याय चालवला आहे त्यावर स्वाभिमानी भूमिका घेण्याची हिंमत आज एकाही मंत्र्यात दिसत नाही. सरकार इतके बुळचट का झाले आहे?”, असा सवाल करत संजय राऊतांनी शाब्दिक हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Sanjay Raut | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे एकीकडे ठाकरे विरुद्ध शिंदे गटात …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now