Sanjay Raut | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे एकीकडे ठाकरे विरुद्ध शिंदे गटात आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरु आहे तर दुसरीकडे सत्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा संघर्ष पाहायला मिळतोय. त्यातच भर म्हणजे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून अस्थिरता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची विशेष बैठक बोलावली होती. महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्र्यांची या विषय़ी नेमकी काय चर्चा झाली आहे, हे बाहेर आलेले नाही. यावरून संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
ते म्हणाले, “तुम्ही दिल्लीत गेलात, तेव्हा गृहमंत्र्यांनी तुम्हाला दोघांना गुंगीचं इंजेक्शन टोचलंय का? बोलायचं नाही काही असं सांगितलं आहे का? तसं असेल तर स्पष्ट सांगा. महाराष्ट्रात यावर लाखोंचा मोर्चा निघाला आहे. लोकांच्या भावना तीव्र आहेत. हे जर राज्याच्या राज्यकर्त्यांना कळत नसेल तर कठीण आहे.
पुढे ते म्हणाले, “आपण वारंवार सांगता की भुजबळांसोबत आम्ही तुरुंगात होतो. अरे मग दाखवा ना तुम्ही लाठ्या खाल्ल्या होत्या ते. तो जोर, तो जोश दाखवा ना. आता तुम्ही सत्तेवर आहात. मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही या प्रश्नावर भूमिका घेत नसाल, तर तुम्ही मुख्यमंत्रीपदावर बसण्यास योग्य नाही.”
“तुम्ही इतर सगळ्या विषयांवर बोलताय. तुम्ही भूखंडाच्या संदर्भात झालेल्या आरोपांवर तासभर उत्तर देता. मग सीमाप्रश्नाबाबत बाजूच्या राज्याचा मुख्यमंत्री रोज आमचाच अपमान करतोय, तर तुम्ही बोलत का नाहीत? तुमची मजबुरी काय आहे. सरकारच्या तोंडात कुणी बोळा कोंबलाय का?”, असा संतप्त सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारला केला आहे.
“एक इंचही जमीन देणार नाही आणि महाराष्ट्रातल्या जागांवरचा हक्क सोडणार नाही असं कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात. इतकी बेअब्रू महाराष्ट्राची गेल्या ७० वर्षांत कधी बाजूच्या राज्यांनी केली नव्हती”, असंही संजय राऊत (Sanjay Raut) यावेळी बोलताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Congress | “शिंदे-बोम्मईंना एकाच खोलीत बंद करा, कर्नाटक सीमाप्रश्न सुटेपर्यंत…”; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा अजब सल्ला
- Corona In Maharashtra | राज्यात कोरोना निर्बंधबाबत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले…
- Sanjay Raut | “संजय राऊतांच्या कानशिलात वाजवल्याशिवाय शांत बसणार नाही”; कोणी दिला इशारा?
- Ajit Pawar | महाविकास आघाडीकडे सर्वाधिक सरपंच आणि जागा ; अजित पवार यांचा दावा
- Ranji Trophy | IPL लिलावापूर्वी अजिंक्य रहाणेचे शानदार द्विशतक