Sanjay Raut | मुंबई : योगगुरु रामदेव बाबा (Ramdev Baba) हे त्यांच्या वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ठाण्यातील एका कार्यक्रमात रामदेव बाबांनी महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केलं आहे. रामदेव बाबांच्या या विधानाचे आता पडसाद दिसायला सुरुवात झाली आहे. रामदेव बाबांच्या या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तसेच, त्यांनी अमृता फडणवीस यांचीही कानउघडणी केली आहे.
ते म्हणाले, “योगगुरु रामदेव बाबा यांचे वक्तव्य हे लज्जास्पद आहे. रामदेव बाबांच्या शेजारी अमृता फडणवीस बसल्या होत्या. परंतु त्या काहीच बोलल्या नाहीत. असं विधान करणारा कुणीही कितीही मोठा असो, त्याच्या सणसणीत कानाखाली बसायला पाहिजे”, एका बाजुला तुम्ही स्त्रियांच्या रक्षणाच्या गोष्टी करता आणि त्याच वेळेला असंख्य महिलांसमोर एक बाबा भगव्या वस्त्रात महिलांचा अपमान करतो.”
पुढे ते म्हणाले, “राज्यपालांच्या बाबतीत सरकार गप्प बसलंय, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषेवर सरकार तोंड शिवून बसलंय. आता रामदेव बाबांसारखे भाजपाचे महाप्रचारक महिलांविषयी असे अभद्र उच्चार काढतात, तरी सरकार गप्प बसलंय. या सरकारची जीभ दिल्लीला गहाण ठेवलीये का? एवढंच मला पाहायचंय.”
नेमकं घडलं काय?
ठाण्यामध्ये महिलांसाठी योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. योगा कार्यक्रमात महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते आणि त्यानंतर महिलांसाठी महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. या महासंमेलनासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र दोन्ही कार्यक्रम सलग असल्याने महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. याबाबत बाबा रामदेव यांनी म्हटलं की साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही अडचण नाही. आता घरी जाऊन साड्या नेसा. पुढे रामदेव बाबा म्हणाले की, “महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटतात, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने तर काही नाही घातलं तरी त्या चांगल्या दिसतात.”
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | शिंदे गटात गेलेल्या प्रतापवराव जाधवांच्या मतदार संघात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा!
- Cancer Pain | कॅन्सरमध्ये शरीरातील ‘या’ भागांमध्ये होतात वेदना
- Avatar: The Way of Water | ‘अवतार:द वे ऑफ वॉटर’चा भारतात धुमाकूळ, रिलीजपूर्वी झाली हजारो टिकिटांची बुकिंग
- Shreyas Iyer | न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामध्ये श्रेयस अय्यरने केला ‘हा’ नवा विक्रम
- National Milk Day | गाई-म्हशीच्या दुधापेक्षा जास्त फायदेशीर आहे शेळीचे दूध, जाणून घ्या फायदे