दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या आमदारांचा ९ हजार ५०० कोटींचा निधी थांबवला आहे, हा जरी मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे, तरी अशा प्रकारे निधी थांबवणे चुकीचे आहे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. संजय राऊत हे सध्या दिल्लीमध्ये आहेत. आज पत्रकारांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. त्याचबरोबर आज सर्व विरोधी पक्षांची राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबरोबर बैठक होणार असून त्यात उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारासंबंधी निर्णय घेण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.
“काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा निधी थांबवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे. हा निधी विकासकामांसाठी दिलेला असल्यामुळे, अशाप्रकारे निधी थांबवणे चुकीचे आहे. तसेच मला भविष्यात होणाऱ्या घटनांबरोबरच दुर्घटना देखील माहित आहेत. त्याचबरोबर घटनेला नैतिकतेचा आधार असतो. पण हे सरकार अनैतिकतेच्या पायावर उभं आहे का?, हे सरकार घटनेनुसार शपथ घेऊ शकत का?, आणि अजूनही मंत्री मंडळ विस्तार का केलेला नाही?”, असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले. तसेच या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्रातील जनतेला मिळायलाच हवी, असे देखील राऊत यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : “केसरकर, उदय सामंत पवारांच्याच शाळेचे प्रमाणपत्र घेऊन..”, संजय राऊतांचा टोला
- Sanjay Raut : “राज्य दिल्लीपुढे झुकणाऱ्या बाजारबुणग्यांच्या हाती…”, संजय राऊतांचा शिंदे सरकारवर निशाणा
- Deepali Sayed : एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; दिपाली सय्यद यांचे ‘ते’ ट्वीट चर्चेत
- CM Eknath Shinde : ठाण्याची पाणीटंचाई मिटणार; मुख्यमंत्र्यांकडून अतिरिक्त १२० दशलक्ष लिटर्स पाण्यासाठी मंजुरी
- Srilanka Crisis : “भारत आमच्या भावासारखा आहे आणि ते…”; श्रीलंकेच्या क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<