Share

Sanjay Raut | “ही सरळ सरळ धमकी समजायची काय?”; शंभूराज देसाईंच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा सवाल 

Sanjay Raut | मुंबई : कर्नाटकातील बेळगाव येथील बागेवाडी येथे मंगळवारी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दुसरीकडे तणावाच्या भीतीने महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगावचा दौरा रद्द केला. यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.

त्यांच्या टीकेनंतर शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. “पुन्हा आराम करायची वेळ येऊ नये, अशी वक्तव्य टाळावीत”, असा टोला शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी लगावला.

शंभूराज देसाईंच्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मंत्री महोदय ही सरळ सरळ धमकी समजायची काय?, असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. महाराष्ट्राची बाजू लढणारे या सरकारचे शत्रू आहेत. सरकार अस्मितेच्या प्रश्नावर गप्प आहे. म्हणून जनता गप्प बसणार नाही. कायदा आणि न्यायालये दबावाखाली आहेत. हे पुन्हा सिद्ध झाले. सत्य बोलणारे तुरुंगात जातील..हाच अर्थ”, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

पुढे ते म्हणतात , “शिवरायांचा अपमान सरकार सहन करत आहे. सीमा वादावर महाराष्ट्राला कर्नाटकआव्हान देत आहे.यावर प्रश्न विचारले की संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची भाषा… कायदा… न्यायालये… तपासयंत्रणा खिशात आहेत असेच शंभूराजे देसाई आणि चंद्रकांत बावनकुळे यांना म्हणायचे आहे का?मी तयार आहे.!!

महत्वाच्या बातम्या :

Sanjay Raut | मुंबई : कर्नाटकातील बेळगाव येथील बागेवाडी येथे मंगळवारी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक केली. या …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now