Share

Sanjay Raut | “सूर्यावर थुंकणारे व्यासपीठावरती बसतात, अन् पंतप्रधान…”; संजय राऊतांची सडकून टीका 

Sanjay Raut | मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण (Samruddhi Mahamarg Inauguration) नुकतंच पार पडलं. उद्घाटन प्रसंगी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या विकासासाठी महत्त्वाच्या अशा 11 ताऱ्यांचा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बोचरी टीका केली आहे.

“पंतप्रधानांच्या 11 ताऱ्यांपैकी महत्त्वाच्या ताऱ्यांचा अपमान होतोय, त्यावर कुणीच काही बोलत नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी केली. कर्नाटक सीमाप्रश्नावर पंतप्रधान काहीतरी बोलतील, मुख्यमंत्री काही बोलतील, यासाठी महाराष्ट्र कानात प्राण एकवटून बसला होता, पण हे ओशाळलेपणाने तिथे दिसून आले, असंही ते म्हणालेत.

संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राला विकासाचे 11 तारे आम्ही देतोयत, असं पंतप्रधान म्हणाले. त्यातला पहिले दोन तारे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे हे आहेत. त्या दोन्ही ताऱ्यांचा अवमान झालाय. छत्रपती शिवाजी महाराज हे तारे नाहीतच. ते प्रखर सूर्य आहेत.” त्या सूर्यावर थुंकणारे त्या व्यासपीठावर होते. ताऱ्यांच्या कशाला गप्पा मारता?, असा खोचक सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलताना केलाय.

पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर थाप मारली. ती थाप बहुधा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडल्याबद्दलची शाबासकी असावी असा टोला त्यांनी लगावला. समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या फलकांवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो चौथ्या क्रमांकावर होता. ही सरकारची बेफिकिरी आहे. महाराष्ट्र हा स्वाभिमान, अभिमान, शौर्यासाठी प्रसिद्ध आहे. त्या महाराष्ट्राच्या नशीबी हे काय आलंय?, असा सवाल करत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या :

Sanjay Raut | मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण (Samruddhi Mahamarg Inauguration) नुकतंच पार पडलं. उद्घाटन प्रसंगी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics