Sanjay Raut | “पंतप्रधान मोदी अशा खोटारड्या माणसाला सोबत कसं ठेवतात?”; राऊतांचा निशाणा कुणावर?

Sanjay Raut | मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातील वाद चांगलाच पेटलेला आहे. संजय राऊत यांनी राणेंविरोधात बदनामीचा दावा दाखल केला आहे. सार्वजनिक मंचावरुन राणेंनी खोटे आरोप केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

अशातच राऊतांनी पुन्हा एकदा नारायण राणेंवर जहरी टीका केली आहे. केंद्रीय मंत्री इतकं खोटं कसं बोलू शकतो? पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा खोटारड्या माणसाला सोबत कसं ठेवतात?, असा सवाल करत त्यांनी राणेंवर निशाणा साधला आहे.

संजय राऊतांचं प्रत्युत्तर

माझं शिक्षण विद्यापीठातून झालंय. अनेक निवडणुकात मी मतदान केलं. २००४ साली माझं नाव मतदार नोंदणी यादीत होतं. त्यांनी यादी चेक करावी, असं राऊत म्हणाले. किरीट सोमय्यांवर देखील मी खटला दाखल करणार आहे. फक्त मीच नाही तर शिवसेनेच्या ज्या नेत्यांवर अशा प्रकारचे आरोप होत आहेत ते सर्व नेते खटले दाखल करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी राणेंनी राऊतांविरोधात वक्तव्य केलं होतं. ‘‘२००४ साली नारायण राणे यांनीच संजय राऊत यांना खासदार केलं. त्यावेळी त्यांचं नाव मतदार यादीत नव्हतं. संजय राऊत हे आपल्यामुळे खासदार झाले. त्यासाठी आपण पैसे खर्च केले’ असा दावा राणे यांनी केला होता. राणेंच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे बदनामी झाल्याचा आरोप करत राऊतांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Back to top button