नागपूर: महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर ईडीच्या कारवायांचे सत्र सुरुच आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. पाटणकर यांच्या ठाण्यातील ११ सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही कारवाई राजकीय दबाव आणि सुड बुद्धीने करण्यात आली असल्याचा आरोप राऊत यांनी यावेळी केला. तसेच भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांच्या घोटाळ्यांचे पुरावे तपास यंत्रणांना आणि पंतप्रधान कार्यालयाला दिले आहेत. तरी देखील बंदूक मात्र आमच्यावरच रोखली जात आहे, असंही राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: