Share

Sanjay Raut | “ते चाळीस आमदार स्वतःला सरकारचे बाप…”; संजय राऊत यांचा जोरदार हल्लाबोल 

Sanjay Raut | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे एकीकडे ठाकरे विरुद्ध शिंदे गटात आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरु आहे तर दुसरीकडे सत्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा संघर्ष पाहायला मिळतोय. त्यातच भर म्हणजे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून अस्थिरता निर्माण झाली आहे. अशातच उद्धव ठाकरे गटातील खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना दैनिकातील ‘रोखठोक’ या सदराततून शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री शिंदे हे मोठे निर्णय घेण्यास असमर्थ आहेत. त्यांच्या गटाच्या चाळीस आमदारांना खूश ठेवण्यातच त्यांचा वेळ जात आहे व ते चाळीस आमदार स्वतःला सरकारचे बाप समजत आहेत.” ते चाळीस आमदार देवेंद्र फडणवीस यांनाही मानायला तयार नाहीत. कारण शिंदे यांना दिल्लीनेच खुर्चीवर बसवले व त्यासाठी त्यांच्याच पक्षाने फडणवीस यांचे पंख कापले, पण त्यात महाराष्ट्राचे नेमके काय भले झाले?’ असा सवालही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर देखील राऊतांनी भाष्य केलं आहे. “सीमा प्रश्न हा भावनिक व अस्मितेचा विषय आहे. 30 तारखेस सर्वोच्च न्यायालयात या प्रश्नी सुनावणी होणार म्हणून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे दोन दिवस आधीच दिल्लीत ठाण मांडून बसले व तेथे बसून पत्रकारांशी संवाद साधत होते. या काळात आपले मुख्यमंत्री कोठे गायब होते?”, असा खोचक सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

“चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांना बेळगावात पाठवून काय साध्य होणार? हे वेळकाढूपणाचे धोरण ठरेल. कर्नाटकात आज भाजपाचे मुख्यमंत्री आहेत व महाराष्ट्रात भाजपपुरस्कृत शिंदे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सीमा प्रश्न सुटला तर आनंदच आहे, पण त्यासाठी जी हिंमत व धमक लागते ती आपल्या मुख्यमंत्र्यांत दिसत नाही व भाजपाचे महाराष्ट्रातील लोक शिंदे यांची मजा पाहत आहेत”, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या :

Sanjay Raut | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. ठाकरे एकीकडे ठाकरे विरुद्ध शिंदे गटात …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now