Share

Sanjay Raut | “फुटीरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो”; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

Sanjay Raut | मुंबई : पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला. बाहेर पडल्यानंतर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. नुकतेच एकनाथ शिंदे गटात दाखल झालेले खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांचे पुत्र अमोल किर्तीकर (Amol kirtikar) अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच असून आज सकाळी त्यांनी संजय राऊतांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी महाराष्ट्रातील शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

माध्यमांशी बोलताना “महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होणार आहेत”, असं भाकीत संजय राऊत यांनी केलं. ते म्हणाले, “महाराष्ट्राचं राजकारण इतकं अस्थिर झालंय, की उद्धव ठाकरे सांगतायत ते खरंय. मध्यावधी निवडणुकांची तयारी दिल्लीत सुरू झाली आहे. जे म्हणतात अमुक-तमुक आमच्यासोबत आहेत, त्यांच्यातच फूट पडण्याची तयारी सुरू झाली आहे. “फुटिरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो”, असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

“महाराष्ट्राला देशाच्या नकाशावरून नष्ट करण्याचे पडद्यामागे प्रयत्न सुरू आहेत. ते रोखण्यासाठी काही काळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं थांबवावं. उणीदुणी काढू नये. फडणवीस यांनी पुढाकार घेऊन विरोधकांची बैठक बोलवावी”, असं आवाहनही संजय राऊत यांनी यावेळी बोलताना केलं.

पुढे ते म्हणाले, “अमोल किर्तीकर (Amol kirtikar) कडवट शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेसोबतच आहेत. गजानन किर्तीकरांनी घेतलेल्या निर्णयात ते सहभागी नाहीत. त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. १०० दिवसांनी तुरुंगातून सुटल्यानंतर जेवढा आनंद झाला नाही, तेवढा आनंद मला अमोल आमच्यासोबत राहिल्याचा झालाय. अशाच कडवट लोकांसोबत शिवसेनेचा प्रवास पुढे जाणार आहे. आम्हाला अनेक लोक सोडून गेले. पण गजानन किर्तीकर सोडून गेल्याचं दु:ख आम्हाला जास्त आहे”, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

Sanjay Raut | मुंबई : पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना विशेष न्यायालयाने जामीन …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now