Share

Sanjay Raut | “हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि…”; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

Sanjay Raut | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले. शिंदे विरुद्ध ठाकरे गटात सुरु झालेली  आरोप प्रत्यारोपाची मालिका काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे सत्त्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटाला गद्दार म्हणवत पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला जातोय. याच पार्वश्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर चांगलाच निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारपासून अनेक ठिकाणी भेट देणार आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) संध्याकाळी पाचच्या सुमारास महापौर बंगला परिसरातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जाणार आहेत. तसेच, संध्याकाळी सातच्या सुमारास मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन करणार आहेत. या मुद्द्यावरून संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदेंना खोचक सल्ला दिला आहे.

ते म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे हे या देशाचे आणि विश्वाचे आहेत. फक्त आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि मग स्मारकाला हात जोडायला जा. कुणीही असतील. मी कुणाचं व्यक्तीगत नाव घेत नाही.”

“काय होतंय, काय होऊ घातलंय हे सगळं बाळासाहेब ठाकरे पाहात आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठित जे लोक खंजीर खुपसतात, त्यांचं कधी भलं झालेलं नाही हा इतिहास आहे. सगळेच बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊ शकतात, पण चांगल्या मनाने जा”, असंही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हंटलंय.

यावेळी बोलताना त्यांनी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडावर (Shraddha murder case) संताप व्यक्त केला. ते म्हणाले, महाराष्ट्रातील मुलीची हत्या धक्कादायक आणि दुर्देवी आहे. सोशल मीडियातून ओळखी होतात. पुढे त्याचं रुपांतर भयंकर नात्यात होतं. मी तिच्या वडिलांची मुलाखत वाचत होतो. त्या कुटुंबाचा आक्रोश, वेदना समजून घेतली पाहिजे. कोणत्या धुंदीत आणि गुंगीत ही मुलं जगत आहेत. हे आज परत एकदा कळलं.

महत्वाच्या बातम्या :

Sanjay Raut | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले. शिंदे विरुद्ध ठाकरे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics Video