मुंबई: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. त्यात महाविकास आघाडी सरकारने बाजी मारली. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हिमालयात कधी जाणार या चर्चांना उधान आले. कोल्हापूरमधील पोटनिवडणुकीमध्ये पराभूत झाल्यास हिमालयात जाणार, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा काँगेसच्या जयश्री जाधव यांनी जिंकली आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली. तेथे त्यांच्या पत्नीच महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. ९७ हजार ३३२ मते मिळवून त्या विजयी झाल्या. या मतदारसंघात भाजपा उमेदवार सत्यजित कदम यांना मिळालेली ७८ हजार २५ मते दुर्लक्षित करण्यासारखी नाहीत. भारतीय जनता पक्षाने ही जागा प्रतिष्ठेची केली होती. त्यांचे प्रांताध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या होम ग्राऊंडवर ही पोटनिवडणूक होती. या पोटनिवडणुकीत स्वतः चंद्रकांत पाटील उतरतील व कुस्ती खेळतील असा कयास होता. ‘‘कोल्हापुरात एखादी पोटनिवडणूक झाली तर मी ती लढवीन व जिंकून येईन’’ असे आव्हान पाटलांनी दिले होते, पण प्रत्यक्ष पोटनिवडणूक लागताच ते गायब झाले. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
चंद्रकांतदादा पाटील यांनी या निवडणुकीत पराभव झाला तर राजकारण सोडून आपण हिमालयात जाऊ अशीही घोषणा केली होती. त्यांना ही संधी कोल्हापूर उत्तरच्या निवडणूक निकालाने दिली होती. ती त्यांनी साधायला हवी होती, पण आता पाटील यांनी त्यावरून पलटी मारली आहे आणि सारवासारव केली आहे. अर्थात चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात न जाता महाराष्ट्रातच राहावे. कारण ते येथे राहतील तोपर्यंत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विजयी होत राहील. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 CSK vs GT : मिलरच्या ‘किलर’ खेळीमुळं गुजरातचा विजय..! चुरशीच्या लढतीत चेन्नईला दिली मात
- भारताच्या चेतेश्वर पुजाराचा इंग्लंडमध्ये ‘डबल’ धमाका; द्विशतकही ठोकलं आणि…! पाहा VIDEO
- IPL 2022: ‘प्लेयर ऑफ द मॅच’ उमरान मलिकचे मोठे वक्तव्य; म्हणाला “माझे काम वेगाने फलंदाजांना…”
- IPL 2022 CSK vs GT : पुण्यात दिसला ऋतुराजचा स्पार्क! गुजरातपुढे १७० धावांचे लक्ष्य
- IPL 2022 : आकाश चोप्राने साधला पंजाबच्या ‘या’ बॉलरवर निशाणा; म्हणाला “तो नेहमी ४० धावा देतो”