Sanjay Raut | मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला आता सात दशकांहून जास्त काळ उलटला. मात्र, कर्नाटकसोबत असलेला सीमाप्रश्न अजूनही सुटलेला नाही. सीमाभागातील अनेक गावांना महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा असल्याचा दावा सातत्याने महाराष्ट्राकडून केला जात आहे. बेळगावमध्ये यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
“शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी सीमारेषेला किमान स्पर्ष तरी करून यावा, बाकी इथे काय कबड्डी खेळायची ती खेळा. पण यांच्यात हिंमत नाही. हे हतबल लाचार लोकं आहेत. हे काहीही करू शकत नाही” अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी (Sanjay Raut) यावेळी बोलताना केलीय.
“हे आम्हाला शिव्या घालातात, हिंमत असेल तर बोम्मईंना शिव्या घालून दाखवा, शिवरायांचा इतिहास तोडणाऱ्यांना शिव्या घालून दाखवा”, असे आव्हानही संजय राऊत यांनी दिलं आहे. शिवरायांचा अवमान असेल किंवा कर्नाटक सीमाप्रश्न असेल, हे सरकार भूमिकाच घेऊ शकत नाही. ही शेवटी असलेली माणसं आहेत. मात्र, प्रत्यक्ष वेळ आली की हातभर शेपटी आत घालतात, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या वक्तव्याचा समाचार घेत भाजपाला थेट आव्हानच केलं आहे. “राजभवनाची बिस्कीटं न खाता, राज्यपालांना ‘कारे’ करून दाखवा”, असं आव्हान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपाला केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याला भाजपकडून काय उत्तर येतंय का? हे पाहावं लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | “राजभवनाची बिस्कीटं न खाता, राज्यपालांना ‘कारे’ करून दाखवा”; संजय राऊतांचं भाजपाला आव्हान
- KVS Recruitment | केंद्रीय विद्यालयामध्ये 13,000 हून अधिक जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Amol Mitkari | भाजपवाल्यांनी शिवरायांच्या अपमानाची सुपारी घेतली ; अमोल मिटकरी यांचा आरोप
- Sanjay Gaikwad | “संजय राऊत फाटक्या तोंडाचे”; संजय गायकवाड यांची सडकून टीका
- Muscle Pain | हिवाळ्यात सांधे दुखीच्या समस्येपासून त्रस्त आहात?, तर करा ‘हे’ उपाय