मोदींनी गरीबीच भांडवल करू नये: संजय राऊत

संजय राऊत

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे समर्थक चहा विकणारी व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाला असं सांगतात, मात्र याचा पुरावा त्यांनी दाखवावा. अनेक राजकारणी गरिबीतून हालाकीच्या परिस्थितीचा सामना करून राजकारणात अनेक पदावर पोहचले आहेत. त्यामुळे भाजपने गरीबीच भांडवल करू नये अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. पुण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक राऊत यांनी घेतली त्यावेळी ते बोलत होते

भाजप सरकारने 3 हजार कोटी रुपये जाहिरातबाजीवर खर्च केले. मात्र सरकारने काय काम केल हेच यातून दिसत असल्याची टीकाही राऊत यांनी केली. गुजरात निवडणुका पाहिल्या तर राहुल गांधी यांच नेतृत्व उभारत आहे आणि त्याचा परिणाम गुजरात निवडणुकीत दिसेल असेही ते म्हणाले.