fbpx

आमच्या मागे रोड रोमियोसारखे का फिरता ? आम्हाला तुमच्यात इंटरेस्ट नाही – संजय राऊत

टीम महाराष्ट्र देशा : आमच्या मागे रोड रोमियोसारखे का फिरता ? आम्हाला तुमच्यात इंटरेस्ट नाही, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २०१७ साली ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. महाराष्ट्रात युती होणार नाही, असं संजय राऊत यांनी ठामपणे सांगितलं आहे.

आमच्या प्रेमात पडा, आमच्याशी लग्न करा, असं म्हणत मागे धावणं हा कायद्याने गुन्हा आहे. आम्ही त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. आम्ही लढणारे लोक आहोत, त्यामुळे ज्यांना ‘पटकायचंय’ त्यांना स्वबळावरच ‘पटकून’ दाखवू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.