fbpx

देशात लोकशाही शिल्लकच राहिली नाही, तर लोकशाहीची हत्या होईलच कशी

टीम महाराष्ट्र देशा : कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केल्याने अखेर मुख्यमंत्री कोण होणार. याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. अखेर आज सकाळी ९ वाजता येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता बहुमत सिद्ध करण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असणार आहे.

सुप्रीम कोर्टात मध्यरात्री दोन ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी ९ वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बी.एस येडियुरप्पा यांच्यावर सडकून टीका केली आहे. देशात लोकशाही शिल्लकच राहिली नाही, तर लोकशाहीची हत्या कशी होईल, अशी विखारी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

‘येडियुरप्पा यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण बहुमत सिद्ध करणं कठीण आहे. ज्या पक्षांकडे बहुमत आहे, अशांना राज्यपालांनी बोलवायला हवं होतं. पण जेव्हा असं होतं तेव्हा लोक बोलतात लोकशाहीची हत्या झाली, पण लोकशाही शिल्लकच नाही तर तिची हत्या कशी होईल? अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

1 Comment

Click here to post a comment