मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणाचा काल(२४ जाने.)जोरदार समाचार घेतला होता. ठाकरे यांच्या या टीकेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी हल्लाबोल केला. तद्पश्चात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्वीट करत भाजपला टोला लगावला. दरम्यान, राऊतांच्या व्यंगचित्रावर आता भाजपच्या खासदार पुनम महाजन(Poonam Mahajan) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात पुनम यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,’स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका’, अशी टीका पुनम यांनी केली आहे. तसेच या ट्विटसह त्यांनी संजय राऊत ट्विटही रिट्विट केले आहे.
स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती.
नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका. https://t.co/dK8l81ZLub— Poonam Mahajan (@poonam_mahajan) January 24, 2022
दरम्यान, संजय राऊत यांनी एक व्यंगचित्र शेअर केले असून या व्यंगचित्रात बाळासाहेब ठाकरे एका खुर्चीवर बसले असून त्यांनी दुसऱ्या खुर्चीवर पाय ठेवले आहे. तसेच बाजूला एक स्टूलही आहे. त्यावेळी तिथे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन उभे असतात. बाळासाहेब त्यांना ‘Have a Seat’ म्हणून बसण्यास सांगतात. असं या व्यंगचित्रात दाखवण्यात आलंय. ‘कोण कुणामुळे वाढले? उघडा डोळे.. बघा नीट’ असे कॅप्शन दिले आहे. तसेच हे व्यंगचित्र ट्विट केल्याच्या काही वेळानंतर राऊत यांनी हे ट्विट डिलीट केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “संजय राऊतांचं गणित लहानपणापासूनच कच्चं आहे की पराभवामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय”
- ‘…म्हणूनच मुंबईत दंगली उसळल्या’; चित्रा वाघ यांचा राऊतांवर हल्लाबोल
- Good News : आदित्य नारायण-श्वेता अग्रवालच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचे आगमन
- भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना ठरली आयसीसी २०२१ “वूमन क्रिकेटर ऑफ द ईयर “
- मी काय आणि कोण हे सलमानला वेळ आल्यावर दाखवून देईन-अभिजीत बिचुकले