नवी दिल्ली: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हिंदुत्वावरून भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच पंतप्रधानांच्या तीर्थयात्रा ठीक आहेत, पण देशाची जनता महागाईच्या मुद्द्यावर होरपळून निघाली आहे, अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली आहे.
अयोध्येत बाबरीचं पतन होत असताना सध्याचे हिंदू वोट बँकवाले पळून गेले. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख त्यावेळी ठामपणे उभे राहिले. त्यामुळे बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा अभिमान आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच आमचं हिंदुत्व शेपूट घालणारे आणि पळपुटं नाही,असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.
बाळासाहेब ठाकरे हे एकमेव नेते आहेत. प्रमोद महाजन यांचं ऑन रेकॉर्ड वक्तव्य आहे. महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यावर मत द्यायला सांगितलं. त्याप्रमाणं हिंदू म्हणून निवडणूक लढवू, असं म्हणाले होते. त्यानंतर पार्ले येथील निवडणुकीत शिवसेनेनं मतदान मागितलं होतं. त्यानंतर शिवसेनेच्या दोन आमदारांचं निलंबन झालं होतं. बाळासाहेब ठाकरेंनी हिंदूना हिंदू म्हणून मतदान करायला लावलं. या देशात हिंदूची वोट बँक आहे हा विचार बाळासाहेब ठाकरे यांनी मांडला.असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या तीर्थयात्रा ठीक आहेत, पण देशाची जनता महागाईच्या मुद्यावर होरपळून निघाली आहे. राज्यसभेत आम्हाला बोलू देत नाहीत. पण या प्रश्नी संसदेत वादळी चर्चा होईल. असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ”त्या’ विद्यार्थ्याला आत्महत्येस भाग पाडणाऱ्या खुनी सरकारवर ३०२ दाखल करा’
- ‘…चे श्रेय काशीचे खासदार असलेले पंतप्रधान मोदी यांनाच द्यावे लागेल’, शिवसेनेकडून मोदींचे कौतुक
- ‘ज्या गंगेच्या पात्रात मोदींनी डुबकी मारली त्याच गंगेत हजारो बेवारस प्रेते वाहताना जगाने पाहिले’
- ‘विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळणाऱ्या सरकारला कसलीच लाज उरली नाही’
- विश्वचषक 2022 : भारत आणि पाकिस्तान आमने-सामने, जाणून घ्या कधी होणार सामना