‘चांद्रयान 2’ वरून संजय राऊतांचा पाकिस्तानला टोला

टीम महाराष्ट्र देशा :  देशाचे आणि जगाचे लक्ष लागून राहिलेल्या ‘चांद्रयान 2’ चे आज श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण झाले आहे. दुपारी 2:43 वाजता ‘चांद्रयान 2’ झेपावले आहे. भारताच्या या महत्वकांक्षी मोहिमेला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला.

देशाचे आणि जगाचे लक्ष लागून राहिलेल्या ‘चांद्रयान 2’ चे आज श्रीहरीकोठा येथून प्रक्षेपण झाले आहे. दुपारी 2:43 वाजता ‘चांद्रयान 2’ झेपावले आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे 15 जुलैला होणारे ‘चांद्रयान 2’ चे प्रक्षेपण रद्द झाले होते. मात्र आता सर्व त्रुटी दूर झाल्यामुळे ‘चांद्रयान 2’ झेपावले.

याचदरम्यान भारताच्या या महत्वकांक्षी मोहिमेनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. ‘तुम रखो अपने झंडे पर चाँद-तारा ,हम तो चाँद-तारों पे अपना झंडा गाड़ेंगे’ वंदे मातरम, अशा आशयाचे ट्विट करत संजय राऊत यांनी पाकिस्तानला टोला लगावल आहे.