Sanjay Raut | मुंबई : जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होत असल्याने राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना (Saamana) आग्रलेखातून हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची पाठराखन देखील केली आहे.
यादरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करणाऱ्या अडाणी उपटसुंभांची मनमानी महाराष्ट्र सहन करणार नाही. महाराष्ट्रात ‘जेम्स लेन्स’चे प्रकरण याआधी घडले आहे, पण अनेक देशी ‘जेम्स लेन्स’ या मातीत उपटले आहेत. त्यांच्यासाठी इतिहास हा पोटापाण्याचा धंदा बनला असेलही, पण महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवराय हा आत्मा आहे. महाराष्ट्राचा हा आत्मा विकू नका! पुराव्यावाचून वाटेल तशी भरमसाट वेडगळ आणि मूर्खपणाची विधाने करणे हा महाराष्ट्रातील ‘विद्वान’ म्हणवून घेणाऱ्या संशोधकांच्या एका गटाचा फार जुना धंदा आहे. अशा संशोधकांना एका पोत्यात घालून हिंदी महासागरात बुडवायला हवे, तरच इतिहासाचे तेज धगधगते राहील, असं सामनामधून म्हटलं आहे.
तसेच, इतिहास चिवडत बसू नका, नवा इतिहास निर्माण करा असा संदेश शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमीच देत असत. सध्या महाराष्ट्रात इतिहासावर जे वादंग माजले आहे त्यासंदर्भात शिवसेनाप्रमुखांचे हे विचार मार्गदर्शक आहेत. ‘हर हर महादेव’ असा एक मराठी चित्रपट पडद्यावर झळकला आहे. या चित्रपटात इतिहासाचे विकृत प्रदर्शन करण्यात आले आहे… छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबाबत असत्य कथन केले आहे, असे आक्षेप आहेत. महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष, संघटनांनी त्यावरुन या चित्रपटास विरोध केला आहे, असं दखील संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपटगृहात घुसून आंदोलन केल्याने त्यांना अटक व सुटका झाली. छत्रपती शिवाजी महाराज या मातीत जन्मास आल्यामुळेच महाराष्ट्राला इतिहास आहे व बाकी राज्यांना फक्त भूगोल आहे. त्या इतिहासाची कोणत्याही पद्धतीची मोडतोड होता कामा नये, असं संजय राऊत सामना आग्रलेखातून म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Amol Mitkari | “चळवळीत ‘या’ चार परिक्षा द्यावा लागतात, आव्हाड साहेब…”, अमोल मिटकरींनी केली आव्हाडांची पाठराखन
- Deepak Kesarkar | ठाकरे अन् शिंदे गट येणार एकत्र?, दीपक केसरकर म्हणाले…
- Jitendra Awhad | “मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय…”, जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ
- Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या अडचणींंमध्ये पुन्हा वाद, जामीनानंतर महिलेकडून गैरवर्तनाचा आरोप
- Gajanan Kirtikar | “गजानन किर्तीकरांचा राजीनामा घेणारच, तोपर्यंत…”; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा इशारा