म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला

shivsena

कणकवली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिवस कोकण दौऱ्यावर होते.त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामधून कोकणाला काय मिळाले, तसेच सिंधुदुर्गात मुख्यमंत्री नव्हे, पर्यटक आले होते, असा टोला लगावत भाजपा नेते नारायण राणे यांनी जोरदार टीका केली. आता या टीकेला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पलटवार केला आहे.

”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणला भरभरून दिले असल्यानेच नारायण राणे यांचा जळफळाट होत आहे. मुख्यमंत्र्यांचा कोकण दौऱ्या कमालीचा यशस्वी झाला असून ही बाब न पचल्यानेच राणे कोकणच्या विकासकामांत खोडा घालण्याचे काम करत आहेत. मात्र राणेंनी कितीही आडकाठी आणली तरी कोकणचा विकास आता थांबणार नाही.’ असे राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

Loading...

तसेच मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सर्व प्रकल्प वेळेतच मार्गी लागणार आहेत. १ मे रोजी चिपी विमानतळावर विमान उतरणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे आणि त्याची पूर्तता निश्चितच मुख्यमंत्री करतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

त्याचप्रमाणे चिपी विमानतळ आणि सी-वर्ल्ड हे प्रकल्प रखडण्यास नारायण राणेच जबाबदार आहेत, असा थेट आरोप राऊत यांनी केला. कोकणातील अनेक छोटे-मोठे प्रकल्प राणेंच्या काळात पूर्ण झाले नाहीत. काही प्रकल्पांची तर कामेही सुरू झाली नाहीत. हे प्रकल्प आजच्या मुख्यमंत्र्यांमुळे मार्गी लागत आहेत, असे राऊत म्हणाले. सिंधुरत्न योजना कोकण विकासाला चालना देणारी असून या योजनेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे राऊत यांनी सांगितले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका