‘संविधान दिन पाळण्याचं नाटक कशासाठी करता?’, संजय राऊतांचा सवाल

‘संविधान दिन पाळण्याचं नाटक कशासाठी करता?’, संजय राऊतांचा सवाल

sanjay raut

मुंबई : आज(२६ नोव्हें.) माध्यमांशी संवाद साधत असतांना शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यावेळी बोलत असतांना देशात संविधान पायदळी तुडवलं जात आहे. राज्याचे आणि नागरिकांचे अधिकार पायदळी तुडवले जात आहेत. त्यामुळे संविधान दिन पाळण्याचं नाटक कशासाठी? असा सवाल त्यांनी केला आहे.

यावेळी बोलत असतांना राऊत म्हणाले की,’सेंट्रल हॉलमधील कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस जाणार की नाही माहीत नाही. राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी सांगू शकत नाही. पण विरोधी पक्षानेच बहिष्कार टाकला आहे. कारण देशात रोज संविधान पायदळी तुडवलं जात आहे. संविधानाचं राज्य या देशात राहिलं नाही. हुकूमशाही पद्धतीने काम चाललं आहे. राज्य घटनेतील अनेक कलम विशेषत: राज्याचे अधिकार हिरावून घेतले जात आहेत. फेडरल सिस्टिम तोडली जात आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर राजभवनात संविधानाच्या बाबतीत काय चाललंय हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे संविधान दिन पाळण्याचं नाटक कशासाठी करता?’, असा सवाल त्यांनी केला आहे.

दरम्यान, हा देश संविधानाच्या माध्यमातून चालावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीत काही मुद्दे मांडले होते. ते महत्त्वाचे आहेत. राज्य आणि जनतेला अधिकार दिले आहेत. पण त्यांचे अधिकारी पायदळी तुडवले जात आहेत. कुठे आहे संविधान? संविधान आमच्यासाठी धर्मग्रंथ आहे. पण हा धर्मग्रंथ रोज पायाखाली तुडवला जात आहे. त्याची अवहेलना केली जात आहे. आमचे सरकार बहुमतात असूनही आमच्याविरोधात केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात आहे. सरकारने एक दिवसासाठी सेंट्रल हॉलमध्ये संविधान दिवस पाळायचं ठरवलं आहे. आमचा विरोधी पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा आहे. आम्ही कार्यक्रमामध्ये सहभागी होणार नाही. बहिष्काराबाबत आम्ही विरोधकांसोबत आहोत. माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackray) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंसोबत(Aaditya Thackray) चर्चा झाली. आमचं ठरलं. आम्ही सर्वांसोबत आहोत,’ असेही राऊत यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: