मुंबई : कणकवलीत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर चाकू हल्ला झाला होता. याप्रकरणी भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर संशयाची टांगती तलवार असून २१ डिसेंबर रोजी पोलिसांनी त्यांची अर्धा तास चौकशी केली. आता नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या मुद्द्यावरून भाजप आक्रमक झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याने सर्व स्तराहून संताप व्यक्त करण्यात आला. अजूनही या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. याविषयी देखील राऊत यांनी भाष्य केले आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,’महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी या विषयाकडे पोटतिडकीने पाहायला हवे. महाराष्ट्र सरकार तरी याप्रश्नी नक्की काय करते आहे? बेळगावच्या तरुणांनी महाराष्ट्रासाठी लढा द्यायचा व येथील सरकारने अंग चोरून बसायचे, हे बरे नाही. बेळगावातील ३८ तरुणांच्या लढय़ाने, त्यागाने रायगडास नक्कीच जाग आली असेल. पण रायगडाच्या पायथ्याशी बसलेल्या मऱ्हाटी, शिवप्रेमी सरकारचे मन द्रवेल काय?महाराष्ट्र सरकार तरी याप्रश्नी नक्की काय करते आहे? कर्नाटकात भाजपचे शासन आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपवाले त्या दडपशाहीवर ‘ब्र’ काढायला तयार नाहीत.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’सिंधुदुर्गातील गुन्हेगारी स्वरूपाच्या कटात सामील झालेल्या ‘उपऱ्या’ भाजप आमदारासाठी फडणवीसांसह संपूर्ण मऱ्हाटी भाजप महाराष्ट्र सरकारविरुद्ध छाती पिटत आहे. याद राखा, खून प्रकरणातील आरोपींना हात लावाल तर. राज्यात राष्ट्रपती शासन लावून घेईन अशा धमक्या ही मंडळी देत आहेत, गोपीचंद पडळकरांवर १४ गुन्हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. पण त्यांच्या सुरक्षेसाठी विधानसभेत भाजपने बॅण्ड वाजवून नाचायचेच काय ते बाकी ठेवले. पडळकरांवरील गुन्ह्यांची यादीच गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाईंनी वाचली. पण बेळगावातील भाजपचे बोम्मई सरकार ३८ मऱ्हाटी तरुणांना नाहक देशद्रोहाच्या आरोपाखाली ठेचत आहे. त्यावर हे लोक बोलत नाहीत. शिवरायांचा अपमान भाजपच्या लेखी झालाच नाही. उलट बेळगावचे तरुण ‘जय भवानी जय शिवाजीं’च्या घोषणा देत निषेध करू लागले हाच त्यांचा मोठा अपराध ठरला आहे. एकीकडे पंतप्रधान मोदी यांनी काशीत जाऊन शिवरायांच्या शौर्याचे गुणगान करायचे व दुसरीकडे कर्नाटकातील त्यांच्याच राज्यात शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध करणाऱ्या मराठी तरुणांना देशद्रोही ठरवून ठेचायचे. भाजप काळात ही अशी मोगलाई वाढत चालली आहे व त्यांची मोगलाई हिंदुत्वाचे नकली मुखवटे घालून फिरत आहे’, असेही राऊत म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बोम्मई यांना आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की, शिवराय नसते तर तुमचीही सुंताच झाली असती’
- राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल सुरु; जाणून घ्या काय आहेत नवे निर्बंध
- ‘बेळगावच्या तरुणांनी महाराष्ट्रासाठी लढा द्यायचा व सरकारने…’, शिवसेनेचे टीकास्त्र
- यूपी योद्धाने गुजरात जायंट्सशी साधली बरोबरी, सामना अनिर्णित
- पंतप्रधान मोदींबाबत शरद पवारांचे मोठे विधान म्हणाले, “यूपीए सरकारमध्ये दुसरा मंत्री नव्हता जो…”
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<