तिहेरी तलाकवर चर्चा होते, पण अॅट्रोसिटीच्या गैरवापरावर नाही हे दुर्दैव : संजय राऊत

संजय राऊत

मुंबई: ‘या देशात तिहेरी तलाकवर चर्चा होऊ शकते. मात्र अॅट्रोसिटीच्या गैरवापरावर चर्चा होऊ शकत नाही, हे दुर्दैव असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल आहे. झी २४ तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भीमा कोरेगाव प्रकरणानंतर अॅट्रॉसिटीच्या गैरवापरावरुन अनेक पेच फुटले आहेत.

अॅट्रॉसिटीचा गैरवापर झाल्याची उदाहरणे आहेत. ते नाकारता येत नाही. आणि त्यामुळेच जातीचे राजकरण निर्माण झाल्याचं राऊतांनी नमूद केलं. त्याचबरोबर भीमा कोरेगाव दंगलीमागे काही अदृश्य हात असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला आहे.