Share

Sanjay Raut | शिवसेनेचे नवे चिन्ह क्रांती घडवेल ; संजय राऊत यांची प्रतिक्रिया!

मुंबई : सोमवारी म्हणजेच काल निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाची नावे जाहीर केली. उद्धव ठाकरे गटला  ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव दिलं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’असं दिलं आहे. तसेच ठाकरे गटाला ‘मशाल’ चिन्ह दिलं असून, शिंदे गटाचे लवकरच आयोग चिन्ह जाहीर करेल. यावर राज्यातील राजकीय नेत्यांनी आप-आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच  शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी यावर भाष्य केलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत ?

शिवसेनेचे नवे चिन्ह कदाचित क्रांती घडवेल असं म्हणत भविष्यात आम्ही अधिक सक्षम होऊ असा, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. संजय राऊत यांना पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केले आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. जामीन अर्जावरील सुनावणीसाठी संजय राऊत न्यायालयात आले असता यांनी शिवसेना चिन्ह आणि नाव गोठवण्याबाबत मत व्यक्त केलं आहे.

आमच्यात शिवसेनेचे रक्त आहे. याआधी जनसंघ, काँग्रेस यांच्यावरही चिन्ह गोठवण्याची वेळ आली होती. यात काही नवीन नाही. नवीन चिन्हानंतर हे पक्षही मोठे झाले. आम्हीही मोठे होऊ,असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, लोकांना खरी शिवसेना कोणती आहे, हे चांगलंच माहित आहे.
दरम्यान, ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि ‘शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे’ असे ठाकरे गटाकडून तीन पर्याय आयोगापुढे सादर करण्यात आले होते. त्याचप्रमाणे ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘मशाल’ हे चिन्हांचे तीन पर्याय दिले होते. मात्र, हे तीनही पर्याय खुल्या यादीतील नसून, ‘त्रिशूळ’ या चिन्हाला धार्मिक संदर्भ असून, शिंदे गटानेही याच चिन्हावर दावा केला होता. त्यामुळे हे चिन्ह दोन्हीही गटांना नाकारण्यात आले. ‘उगवता सूर्य’ हे ‘द्रमूक’ पक्षाचे चिन्ह असल्याने तेही नाकारण्यात आले आणि ठाकरे गटाला ‘मशाल’हे चिन्ह देण्यात आले

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : सोमवारी म्हणजेच काल निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाची नावे जाहीर केली. उद्धव ठाकरे गटला  ‘शिवसेना (उद्धव …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics