मसुदा बिसुदा काही नाही फक्त मुख्यमंत्री पदावर बोला – संजय राऊत

टीम महाराष्ट्र देशा : मसुदा नको मुख्यमंत्री पदावर बोला, असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच मुख्यमंत्री पदाचे लिखित स्वरूपातील पत्र आधी आम्हाला द्यावे .आम्हाला मुख्यमंत्रीपदच हवे आहे असेहि ते म्हणाले आहेत.ते मुंबई येथे माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यामध्ये निर्माण झालेला सत्तास्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. आज विद्यमान सभागृह बरखास्त होणार असल्याने राज्यात नेमकं काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पदावर रस्सीखेच सुरु आहे.

लोकसभा निवडणुकीत जे ठरलं तेवढचं मिळाव, शेवटपर्यंत युती टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आता भाजपने काय तो निर्णय घ्यावा, असं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या बैठकीमध्ये केल होत . त्यामुळे आजही शिवसेना मुख्यमंत्री पदावर ठाम असल्याचं स्पष्ट झाल आहे.

महत्वाच्या बातम्या