Sanjay Raut | “औरंगाबादचे नामांतर करण्याची हिंमत त्यांच्यात नाही”; राऊतांचा भाजपवर निशाणा

Sanjay Raut | मुंबई : राज्यात काही शहरांच्या नामांतरावरुन मोठं राजकारण झालं. त्यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये टीका-टिपण्णीही झाली. उस्मानाबाद शहराचे धाराशीव नामकरण करण्यास केंद्र सरकारने ‘ना हरकत पत्र’ दिले असून, औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे केंद्राच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार सडकून टीका केली आहे.

Sanjay Raut Criticize BJP

“महाविकास आघाडी सरकार असताना भाजपचे नेते ‘हिंमत असेल तर औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करून दाखवा’, अशी गर्जना करत होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी हे नामांतर करण्याचा निर्णय घेतला. पण, आता हा प्रस्ताव केंद्र सरकारने रखडून ठेवला आहे. याचं कारण काय? औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धारशीव करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या सरकारने घेतला. मात्र भाजप आता त्यावर भूमिका घ्यायला तयार नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

“भाजपचे लोक ढोंगी, नामांतर करण्याची त्यांच्यात हिंमत नाही”

“भाजपचे नेते नेमकं कोणाला घाबरत आहेत. यावर निर्णय न घ्यायला कोणता कायदा आडवा येतो आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे राज्य आहे. मग नेमकी अडचण काय आहे? मुळात भाजपचे लोक ढोंगी आहे. त्यांनी अलाहाबादचे नामांतर केलं. मात्र, औरंगाबादचं नामांतर करण्याची त्यांच्यात हिंमत नाही”, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

नामांतरावर शिक्कामोर्तब

औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव बदलण्याचा प्रयत्न यापूर्वीही करण्यात आला होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने राजकीय फायद्यासाठी त्यांच्या मंत्रिमंडळाच्या अंतिम बैठकांमध्ये या दोन शहरांच्या नामांतराचा ठराव बेकायदेशीरपणे मांडला. त्यानंतर 16 जुलै 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्त्वाखालील सरकारने या नामांतरावर शिक्कामोर्तब केलं.

जुलै 2022 मध्ये औरंगाबादचं ‘छत्रपती संभाजीनगर’ असं तर उस्मानाबादचं ‘धाराशिव’ असं नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. मोहम्मद अहमद, अण्णासाहेब खंदारे आणि राजेश मोरे या तीन व्यक्तींनी मिळून ही याचिका दाखल केली आहे.

महत्वाच्या बातम्या-