मुंबई: एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठींबा दर्शविला आहे. त्या आज मुंबईत येणार आहेत. त्या भाजप आणि शिंदे गटाच्या आमदार, खासदारांशी संवाद साधून त्यांना मतदान करण्याचं आवाहन करणार आहे. शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा दिल्याने मुर्मू या मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार का? याबाबत चर्चा रंगत आहेत. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
“द्रौपदी मुर्मू यांनी शिवसेनेत याव म्हणून हा निर्णय घेतला नाही. ही आमची भावना आहे. आदिवासी समाजाबाबतचा आदर आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा दिला आहे. मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय राजकीय नाही. शिवसेनेत अनेक आदिवासी कार्यकर्ते आहेत. आदिवासी कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याने हा निर्णय घेतला. यापूर्वी प्रतिभा पाटील यांना महाराष्ट्राची कन्या म्हणून पाठिंबा दिला. प्रणव मुखर्जी यांनाही पाठिंबा दिला होता. शिवसेनेची ही परंपरा आहे.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान मातोश्रीवर याव्यात म्हणून द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. द्रौपदी मुर्मू या मागास भागातून आल्या असून त्या राष्ट्रपती व्हाव्यात ही राष्ट्राची भावना आहे. त्यामुळे निवडणुका आणि राजकीय फायद्या तोट्याचं गणित आम्ही पाहिलं नसल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- MNS : अमित ठाकरेंना शिंदेंच्या मंत्रीमंडळात स्थान मिळणार; पहा राज ठाकरे काय म्हणाले?
- Sandip Deshpande | शिवाजी पार्क मैदानावरील रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प मोडीस निघाला- संदीप देशपांडे
- Affordable bikes । कमी बजेटमध्ये जास्त मायलेज देणारी बाईक घ्यायची आहे?; पहा “या” आहेत 65000 पेक्षा कमी किंमतीच्या बाईक्स
- Clyde Crasto : “केसरकर मंत्रिपदाच्या आशेने स्वतःची…”, पवारांवरील टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर
- Shahajibapu Patil : भविष्यात शिंदे-ठाकरे एकत्र येणार?; शहाजीबापू म्हणाले…
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<