fbpx

भाड मे गया कानून और भाड में गयी आचारसंहिता, गुदमरलेल्या राऊतांचे बेताल विधान

sanjay raut

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे राजकीय नेते भाषण करताना जोश मध्ये येवून आचारसंहितेचा भंग करताना दिसत आहेत. तर आता शिवसेनेचे जबाबदार नेते संजय राऊत यांची देखील जीभ घसरली आहे. एका कार्यक्रमात भाषणा वेळी त्यांनी ‘भाड मे गया कानून और भाड में गयी आचारसंहिता’, असे वादग्रस्त विधान करत निवडणूक आयोगालाचं आव्हान केले आहे.

मुंबई येथील एका रामनवमीच्या कार्यक्रमात राऊत यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत. आचारसंहिता चालू असल्याने जे मनात आहे ते बाहेर नाही आलं की श्वास कोंडल्यासारख होतं. त्यामुळे भाड मे गया कानून और भाड मे गयी आचारसंहिता असे राऊत म्हणाले. त्यामुळे राऊत याचं हे वक्तव्य थेट आचारसंहितेचा भंग करणार असून निवडणूक आयोगाला आव्हान देणार आहे.

दरम्यान  संजय राऊत आता या विधानामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. करण आचारसंहितेच्या काळात असे बेलगाम वक्तव्य केल्याने निवडणूक आयोगा कडून कारवाई केली जाऊ शकते.