‘त्याने’ कोरोना होतो, असं ‘डॉक्टर’ अजित पवारांनी सांगितलंय – संजय राऊत

sanjay raut

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल पुण्यात महापालिका अधिकाऱ्यांसोबतची एक बैठक संपवून ते बाहेर आले, तेव्हा अजितदादांनी दुरूनच नमस्कार केला होता. कोरोना संपल्यावर मीडियाशी बोलेन, एवढंच मोघम बोलून ते पुढे निघाले. तेव्हा, काही जणांनी बूम माईक पुढे नेले. त्यावर, ते जवळ आणू नका, त्याने कोरोना होतो, असं ते म्हणाले.

याचाच धागा पकडत शिवसेना खासदार संजय राऊत भाष्य केलं आहे. आज खासदार राऊत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनवर जाऊन भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘अजित पवार काल म्हणालेत बूम लांब ठेवा. त्याने कोरोना होतो, असं ‘डॉक्टर’ अजित पवारांनी सांगितलंय.’

तसेच ते एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हणाले की, ‘विरोधी पक्षांना आंदोलनाचा अधिकार आहे, मात्र सध्या देश, महाराष्ट्रात जे संकट आहे, अशावेळी विरोधकांनी सरकारसोबत उभं राहायला हवं,’ असं राऊत म्हणाले.

दरम्यान, ‘उदय सामंत यांनी मत व्यक्त केलं, राज्यपाल हे कुलपती आहेत, त्यांनी त्यांचं मत सांगितलं, त्याबाबत सरकार-संबंधित मंत्री निर्णय घेतील. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे-माझे जुने संबंध, राज्यपालांना सरकार काय करतंय याची माहिती आहे,’ असं राऊत यांनी सांगितलं.