नागपूर: काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. यांची ठाण्यातली संपत्ती जप्त करून ED ने मोठा दणका दिला आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय दबाव आणि सुड बुद्धीने करण्यात आली असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.
“फक्त महाराष्ट्रातच नाही तर जिथे जिथे भाजपची सत्ता नाही, अश्या प्रत्येकच राज्यांमध्ये अशा प्रकारच्या कारवायांना ऊत आला आहे”, असा घणाघाती आरोप त्यांनी यावेळी केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाच्यावर झालेल्या कारवाईवरही भाष्य केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<