Share

Sanjay Raut Birthday | “रोज सकाळी ९ वाजता अनेकांचे १२ वाजवणारे…”, संजय राऊतांना रोहित पवारांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

Sanjay Raut Birthday | मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस आहे. रोज सकाळी ९ वाजता राऊतांनी अनेकांचे १२ वाजवले आहेत. यावरुनच राष्ट्रवादी (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे.

रोज सकाळी ९ वाजता अनेकांचे १२ वाजवणारे आणि ‘मोडेल पण वाकणार नाही, कुणापुढं झुकणार नाही’, हा मराठी बाणा जगणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खा. संजय राऊत साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! चुकीच्या गोष्टींविरोधात लढण्यासाठी आपल्याला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणी १०२ दिवस तुरुंगात होते. मात्र, त्यांना काही दिवसांपुर्वीच जामीन मिळाला आहे. जामीनानंतर सुद्धा राऊतांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं होतं. तसेच त्यांची अटक ही बेकायदा असल्याचं देखील न्यायालयाने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Sanjay Raut Birthday | मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस आहे. रोज सकाळी ९ वाजता राऊतांनी अनेकांचे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now