Share

Sanjay Raut । “संजय राऊतांची अटक बेकायदेशीर आणि अवैध” ; मुंबई हायकोर्टाची मोठी टिप्पणी

Sanjay Raut । मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना तब्बल १०० दिवसांनंतर जामीन मिळाला आहे, अखेर पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक करण्यात आली होती.

दरम्यान ईडीने संजय राऊत यांच्या जामिनाला विरोध केला. ईडीने या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली. यावर न्यायालयाने निर्णय देत ईडीला मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने ईडीची मागणी फेटाळली आहे. विशेष म्हणजे मुंबई हायकोर्टाने (Mumbai Highcourt) खूप महत्त्वाची टिप्पणी केलीय. संजय राऊत यांना झालेली अटक ही बेकायदेशीर आहे, असं हायकोर्टाने म्हटलं आहे.

ईडीने स्वत:च्या मर्जीने आरोपी निवडले असल्याचं हायकोर्टाकडून सांगण्यात आलंय. ईडीने संजय राऊतांना कोणत्या कारणाने अटक केली? ईडीकडे कारणच दिसत नाही,  मुख्य आरोपी राकेश आणि सारंग वाधवान यांना मोकाट सोडलं आणि संजय आणि प्रवीण राऊत यांना अटक कशी केली?, असा सवालही हायकोर्टाने केला आहे.

हा वाद पूर्णपणे दिवाणी आहे, पण त्याला मनी लाँड्रिंग किंवा आर्थिक गुन्हा असं लेबल ईडीने लावलं. अशी लेबल लावून तुम्ही निष्पाप व्यक्तीला गुन्हेगार ठरवून तुम्ही तुरुंगात डांबू शकत नाही अशा परिस्थितीत जे योग्य आहे तेच कोर्टाला करावं लागेल, मग तो समोर कोणीही असो, असं हायकोर्टाकडून सांगण्यात आलंय.

महत्वाच्या बातम्या :

Sanjay Raut । मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना तब्बल १०० दिवसांनंतर जामीन मिळाला आहे, अखेर पीएमएल कोर्टाकडून …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now