Sanjay Raut | “ते रहस्य फडणवीस कधीच सांगू शकत नाहीत”; फडणवीसांच्या दाव्यावर राऊतांचं सडेतोड उत्तर

Sanjay Raut | मुंबई : राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पहाटेचा शपथविधी, त्यात शरद पवार (Sharad Pawar) यांची भूमिका, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकाकडून फडणवीस यांना अटक होण्याची भीती अशा अनेक विषयांनी राजकीय नेत्यांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीच्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थीवर अनेक वक्तव्ये केली त्यावरुन राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरु झाल्या आहेत. फडणवीस यांच्या आरोपांना संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही सडेतोड उत्तरं दिली आहेत.

“शपथविधीचं रहस्य फडणवीस कधीही सांगू शकणार नाहीत”

“शपथविधीचं सत्य आणि रहस्य देवेंद्र फडणवीस कधीही सांगू शकणार नाहीत, त्यांना यातलं काहीही माहिती नाही. मी त्या वेळी शरद पवार यांच्या संपर्कात होतो, मला सगळं माहिती आहे.. पण हे सत्य कदाचित जनतेसमोर येणारच नाही”, अशीही प्रतिक्रया संजय राऊत यांनी दिली आहे.

“फेकाफेकीला महाराष्ट्रात ऊत आलाय”

“ही फेकाफेक आहे. अचानक फेकाफेकीला महाराष्ट्रात का ऊत आलाय हे कळत नाही. चांगलं सरकार आलंय. मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. सुप्रीम कोर्टाकडे लक्ष आहे. निराशा असल्याने एक प्रकारचं वैफल्य दिसतंय.. अशा प्रकारे अडीच वर्षांपूर्वी ज्या घटनेविषयी माहिती नाही, त्याविषयी येऊन अशा प्रकारे फेकाफेक करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही”, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

“फडणवीसांचा खरा चेहरा कळला”

“या कार्यक्रमात त्यांना असे प्रश्न विचारले ते बरं झालं. लोकांना फडणवीसांचा खरा चेहरा कळला. सत्तेसाठी भाजप किती आसुसलेला आहे.. पहाटे शपथविधी करण्याचा प्रयत्न केला. मग तुम्ही शिवसेना फोडण्याचा प्रयत्न करत राहिला. अजूनही आमच्या संपर्कात काँग्रेसचे लोक आहेत, असं म्हणतात. माणसाला सत्तेचा किती अहंकार असावा, हे पाहतोय. फडणवीस यांना स्वतःला सभ्य, सुसंस्कृत, काळाचं भान असलेले नेते असं समजत होते”, असंही संजय राऊतांनी सांगितलं आहे.

“फडणवीस स्वतःचं अवमूल्यन करून घेत आहेत”

“पाच-सहा महिन्यांपासून त्यांची लय बिघडत चालली आहे. मंगेशकरांचं गाणं ऐकायला जावं अन् वेगळाच सूर ऐकायला याला. कंप पावणारा थरथरणारा. असं काहीतरी फडणवीस यांच्या बाबतीत जाणवतंय. ते स्वतःचं अवमूल्यन करून घेत आहेत. त्या शपथविधीच्या काळात शरद पवार यांच्या संपर्कात मी होतो. मी शरद पवार यांना चांगलंच ओळखतो. त्यांनी ठरवलं असतं तर ते सरकार चालवलं असतं. ते सरकार पाडण्यासाठी स्थापन करत नाहीत. लोकशाहीवर त्यांची श्रद्धा आहे. राज्याचं स्थैर्य हा त्यांच्या चिंतनाचा विषय असतो”, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Exit mobile version