मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर राज्यातील राजकीय सूत्रे हलली आहेत. महाविकास आघाडी सरकारलाही याचा मोठा धक्का बसला आहे. शिवसेना तसेच मविआ नेत्यांच्या अनेक बैठका ऑनलाईन सभा होत आहेत. या पार्श्वभूमीवरच आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर निशाणा साधला आहे. दहिसरमध्ये शिवसेनेचा जाहीर मेळावा पार पडला. या मेळाव्यात संजय राऊत बोलत होते.
“ज्यांनी बाळासाहेबांचे शाप घेतले ते संपले. एका बापाचे असाल तर राजीनामा द्या आणि समोर या. आमच्या नजरेला नजर मिळवण्याची त्यांच्यात हिमत नाही. कारण ही शिवसेना आहे. अनेक विष पचवून उभी राहिलेली ही शिवसेना आहे. कुणालाही न घाबरणारे हे वाघ आहेत. शिवसैनिकाला पाहिल्यावर मोदी आणि शहाही रस्ता बदलतात. ही शिवसेनेची ताकद आहे.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच पुढे ते म्हणाले की, “कुणाची हिंमत नाही आमच्या दंडाला हाथ लावण्याची, आमच्या नादाला लागू नका. वेळ पडलीतर झेंडा खिशात ठेवेल आणि दांडा बाहेर काढेल. अशीही शिवसेना आहे.”
महत्वाच्या बातम्या:
- IND vs IRE : ‘‘मला कोणालाही काहीही दाखवण्याची गरज नाही..”, कॅप्टन हार्दिक पंड्याचं विधान चर्चेत!
- Kiran Mane : जातीयवादी पोस्ट करू नका असा सल्ला देणाऱ्याला किरण मानेंच सडेतोड उत्तर, म्हणाले…
- Sanjay Raut : “तुमच्यात हिंमत असेल तर…” ; संजय राऊतांचं बंडखोर आमदारांना खुलं आव्हान
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे दारूच्या नशेत? व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय ?
- Breaking News : शिंदे गटाला केंद्राकडून सुरक्षा, बंडखोर आमदारांच्या घराबाहेर CRPF तैनात
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<