शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. राऊत यांची अलिबाग आणि मुंबईमधील संपत्ती जप्त करण्यात आली असून त्यात अलिबागमधील जमिनीचे आठ तुकडे आणि दादरमधील एक फ्लॅट जप्त करण्यात आलाय. त्यावर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी कुणाच्या बापालाही घाबरत नाही. असं इशारा त्यांनी विरोधकांना दिला आहे.
यावेळी संजय राऊत यांनी भाजप नेते किरीय सोमय्या यांच्यावर देखील तिखट शब्दात टीका केली.