‘सुशांत सिंह प्रकरणात संजय राऊत,आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी,जेणेकरून सत्य समोर येईल’

sanjay raut and aaditya thackeray

मुंबई- सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात बिहारमध्येही पोलीस तक्रार करण्यात आली आहे. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी ही तक्रार केली आहे. मात्र सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणाने मंत्री आदित्य ठाकरेंचे नाव येताच शिवसेनेचे खासदार संजय राऊत मैदानात उतरले आहेत. खा.राऊत यांनी सुशांतच्या वडिलांवर गंभीर आरोपही केलेत.

सुशांतचे त्याच्या कुटुंबाशी संबंध चांगले नव्हते. सुशांतच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते, जे सुशांतला आवडलेले नव्हते, असा आरोप राऊत यांनी केला. या आरोपाने भडकलेल्या सुशांतच्या कुटुंबाने आता संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपा प्रवक्ते निखिल आनंद यांनी महाराष्ट्र सरकार सुशांत सिंग राजपूतच्या सीबीआय चौकशीमुळे भयभीत का आहे? असा सवाल केला आहे. सीबीआयच्या तपासामुळे शिवसेना खूप चिंताग्रस्त आणि भयभीत आहे. जर शिवसेनेच्या लोकांना सर्व काही माहित असेल तर सीबीआयने संजय राऊत, आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी, जेणेकरून सत्य समोर येईल. आदित्य ठाकरे यांनी भीतीपोटी स्पष्टीकरण दिलं आहे, त्यांनीच का राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही मौन सोडावं असं निखील आनंद यांनी सांगितले आहे.

दरम्यान, सुशांतचा चुलत भाऊ आणि भाजपा आमदार नीरज कुमार सिंग बबलु यांनी संजय राऊतांनी केलेले सगळे आरोप धुडकावून लावलेत. शिवाय या आरोपांवर तीव्र संताप व्यक्त केला. संजय राऊत यांनी आमच्या कुटुंबावर केलेला लज्जास्पद आरोप निंदनीय आहे. याविरोधात आम्ही मानहानी दावा करू, असे नीरज म्हणाले.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

12 ऑगस्टला ‘वंचित’कडून डफली बजाव आंदोलन;लॉकडाउनच्या विरोधात रस्त्यावर उतरणार !

कोकणातील शरद पवारांच्या कट्टर समर्थकाचा फडणवीसांच्या उपस्थित ‘भाजपा’त प्रवेश

धक्कादायक : भाजपा आमदारासह कुटुंबातील आणखी 6 जणांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह