संजय राठोड पोहरादेवीला रवाना; पूजा चव्हाण प्रकरणात काय भूमिका मांडणार याकडे लक्ष

संजय राठोड

यवतमाळ : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. काही दिवसांपूर्वी पूजाने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले होते. यानंतर महाविकास आघाडीमधील वनमंत्री संजय राठोड यांच्या या मुलीशी संबंध असून काही कथित कॉल रेकॉर्डिंग्स देखील समोर आले होते.

परंतु या सर्व प्रकरणानंतर गेले अनेक दिवस संजय राठोड गायब होते. गेले १४ दिवस नॉट रीचेबल असलेले वनमंत्री संजय राठोड उद्या पोहरादेवीला येणार असल्याची माहिती देवस्थानाच्या महंतांनी दिली होती. या वरती आता जिल्हाअधिकारी कार्यालयाने शिक्कामोर्तब देखील केले. आज पोहारादेविला जाण्यासाठी रवाना झाले आहेत.

येथे विधीवत पूजा संपन्न झाल्यानंतर आणि संतांचं दर्शन झाल्यानंतर धर्मपीठाला भेट दिल्यानंतर ते या ठिकाणहून निघतील असंही सांगण्यात आलं आहे. या ठिकाणी राठोड माध्यमांशी संवाद साधण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं झाल्यास ते नेमकं काय बोलणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलं आहे.

पोहरादेवी हे बंजारा समाजाचे दैवत आहे. आज त्याठिकाणी सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत याग आयोजित करण्यात आला आहे. संजय राठोड हे आपल्या समर्थकांसह तेथे येणार आहेत. तेथे शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मनोरा पोलिसांनी पोहरादेवी विश्वस्तांना नोटीस बजावली असून मंदिरात केवळ ५० जणांना परवानगी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या